कृषिपंप ग्राहकांकडे एकशे नट्ट कोटी थकीत

0
13

गोंदिया दि.30ः महावितरणाच्या गोंदिया परीमंडळातील कृषिपंप ग्राहकांकडील वाढती थकबाकी लक्षात घेता तिला आळा घालण्यासाठी जे चालू वर्षातील देयके भरणार नाहीत,अश्या ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. गोंदिया परिमंडळात कृषीपंप ग्राहकाकडे सुमारे १०८ कोटी ८० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका बसत आहे.वीज खंडित करणाच्या कारवाईला सुरवात केलेली आहे. त्यादृष्टीनेच कृषिपंप ग्राहकाच्या वीजबिल थकबाकी वसुलीकडे महावितरणने गांभिर्याने लक्ष दिलेले आहे.
एप्रिल ते जुलै २०१७ असे आकारण्यात आलेली चालू देयके कृषिपंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.गोंदिया परिमंडळात एकूण ७५ हजार ७४८ कृषीपंप ग्राहकांकडे जुन २०१७ अखेर १०८ कोटी ८० लाख रुपयांची थकबाकी आहे.यात गोंदिया जिल्ह्यातील ३२ हजार ग्राहकांकडे ४१ कोटी ६५ लाख तर भंडारा जिल्ह्यातील ४३ हजार ७३३ ग्राहकांकडे ६७ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी आहे.पुढील वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी कमीत कमी चालू वर्षातील दोन त्रैमासिक वीजबिलाची रक्कम त्वरित भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे,असे आवाहन मुख्य अभियंता जीजोबा पारधी यांनी केले आहे.