योग व निसर्गोपचार डाॅक्टरांनवर बोगस डॉक्टर म्हणून कार्रवाई नको : डॉ.अमीर मुलाणी

0
20
सोलापूर,दि.07 : महाराष्ट्र मध्ये योग आणि निसर्गोपचार डाॅक्टरांनवर बोगस डॉक्टर म्हणून बर्‍याच डॉक्टरांनवर कार्रवाई करण्यात आल्या आहेत. योग आणि निसर्गोपचार प्रशिक्षण घेतल्याना व्यावसाय करता येतो, त्यामुळे त्यांच्यावर बोगस डॉक्टर म्हणून होणारी कारवाई चुकीची असून प्रशिक्षण व मिळालेल्या शिक्षणाप्रमाणे व्यावसाय करीत असल्याने त्यांच्यावर होणारी कारवाई चुकीची असल्याचे डाॅ.अमीर मुलाणी यांनी म्हटले आहे.
आरोग्य अधिकारीकडून तपासणीच्या वेळी वैद्यकीय अर्हता आणि कौन्सिलबाबत विचारणा करण्यात येते, ते पुर्णपणे चुकीची असून वैद्यकीय अधिनियमाप्रमाणे योग आणि निसर्गोपचार व्यवसाय करीत नाहीत.त्यामुळे त्यांच्यावर बोगस डॉक्टर म्हणून होणारी कारवाई थांबविण्यात यावे,यासाठी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना भेटून तसेच महाराष्ट्रतील सर्व जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे डॉ.अमीर मुलाणी यांनी म्हटले आहे. यावेळी डाॅ.प्रसाद शिंगोटे (माजी सुप्रिटेंडट जुन्नर ग्रामीण रुग्णालय), कृष्णा रामा साबळे(महाराष्ट्र राज्य आदिवासी समाज सेवक  पुरस्कार प्राप्त) निमगिरी पुणे,डाॅ.संदिप कांबळे (वैद्यकीय अधिकारी भरारी पथक भोरगिरी पुणे),डॉ.शब्बीरभाई पठाण सातारा, डॉ.विश्वास फपाळे ओतूर पुणे, डॉ.अनिता शिंदे जालना, डॉ.सिता भिडे मुंबई, डॉ.प्रवीण निचात मुंबई, डॉ.सारिका फपाळे पुणे, फिरोज पाठण वाई सातारा, डाॅ.रंजनी साळवे सोलापूर, वनिता झा युपी,  डॉ.अमीर मुलाणी सोलापूर, अमृता चव्हाण शिराळा, अजिज नायकुडे इंदापूर, हसिना मुलाणी कादलगांव, बशीर मुलाणी फुटजवळगांव आदी मान्यवर व असंख्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.