ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती

0
11

मुंबई. (विशेष प्रतिनिधी),दि.05 ― ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव व मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी केली आहे.
यावेळी अन्सारी म्हणाले की, भारतात युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर बदल घडवत आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील बारा बलुतेदार ― अतुलेदर मधील मुलाणी समाजासाठी शाहरुख मुलाणी यांचा संघर्ष पाहता त्यांची नियुक्ती ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन मध्ये महाराष्ट्र राज्य सचिव व मंत्रालयीन सचिव पदी करण्यात आली आहे. हार्दिक पटेल, कन्हैया कुमार, आ. जिग्नेश मेवानी यांच्या सारखेच चळवळीतील कार्यकर्ते शाहरुख मुलाणी आहेत असे अन्सारी यांनी नियुक्ती पत्र देताना असे प्रतिपादन केले. यावेळी शाहरुख मुलाणी यांनी नियुक्ती पत्र स्वीकारताना म्हणाले की, मुसलमान समाजाला आरक्षण हे शब्बीर अन्सारी यांच्या मुळे मिळाले आहे. मुसलमान समाजातील आर्थिक, शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा स्तर उंचाविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार असून युपीएससी व एमपीएससीत अधिकाधिक मुसलमान मुले कसे अधिकारी होतील या दृष्टीने प्रयत्न करणार असून संघटनेच्या माध्यमातून मुसलमान समाजाच्या विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मुसलमानांसाठी  जाहीर केलेल्या सवलती जातिनिहाय नसून पारंपरिक व्यवसायावर आधारीत असल्याने संपूर्ण मुसलमान समाजाला त्याचा लाभ व्हावा याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच जास्तीत जास्त मुसलमान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी जातीच्या दाखले संदर्भात नागरिकांना होणाऱ्या अडचणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून शासनाच्या आदेश व निर्णय नुसार मुसलमान ओबीसी समाजाला येणाऱ्या शैक्षणिक काळात न्याय मिळवून देण्यासाठी भाग पडेन असे सांगितले. यावेळी मुंबईचे संपर्क प्रमुख व सोलापूरचे जिल्हाध्यक्ष इसाक खडके, गुफारन अन्सारी, वसीम अन्सारी, पुणेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल जब्बार व इतर मान्यवर उपस्थित होते.