वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरणार

0
8

मुंबई,दि.10 – राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मंजूर विद्यार्थ्यांच्या जागा कमी होण्याचे संकट आहे. ते दूर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला जाग आली असून, विभागाच्या सचिवांनी रिक्त पदांचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महाविद्यालय व रुग्णालयात 650 जागा रिक्त आहेत. नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या मंजूर जागांनुसार प्राध्यापकांसह अन्य पदे मंजूर केली जातात. परंतु राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याचे केंद्राने राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे काही काळ प्रतिनियुक्तीवर नियुक्‍त्या करून वैद्यकीय शिक्षण विभागाने तात्पुरती मलमपट्टी केली होती. आता यामधून मार्ग काढण्यासाठी या विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांच्या रिक्त पदांची माहिती घेऊन आढावा घेणे सुरू केले आहे.