एकाच दिवशी ११ वाचनालये सुरु करण्याच्या विक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

0
38

कोल्हापूर (प्रतिनिधी)दि. १३:-भागीरथी महिला संस्थेच्या वतीने एकाचवेळी ११ वाचनालयं सुरु करण्याच्या विशेष उपक्रमाची, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद घेतली असून संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील दादा पाटील यांच्याकडून विक्रमाबाबतचं प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांना शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन सोहळा आणि ११ ग्रंथालयांच्या उद्घाटन प्रसंगी प्रदान केले. या प्रसंगी डॉ. सुनील दादा पाटील म्हणाले, ‘भागीरथी संस्थेचा वाचनालयाचा उपक्रम अनुकरणीय आणि अत्यंत कौतुकास्पद आहे.’ डॉ. सुनील दादा पाटील यांनी वाचनालयाच्या उपक्रमासाठी १३,००० रुपये किंमतीची १२१ पुस्तके भेट दिली.  सौ. अरुंधती धनंजय महाडिक कोल्हापूर येथील एक उपक्रमशील सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी आणि गावागावात ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठीभागीरथी महिला संस्थेच्या वतीने वाचनालय चळवळ मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत गावागावात भागीरथी वाचनालय सुरु करण्यात येत आहे. लवकरच ५० ठिकाणी भागीरथी वाचनालयांची स्थापना केली जाणार आहे.  ८ मार्च २०१८ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पहिल्या टप्प्यात ११ ठिकाणी एकाच दिवशी भागीरथी वाचनालय सुरु केले आहे.महिलांनी महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु केलेली ही एकमेव ग्रंथालय चळवळ ठरली आहे.

 ८ मार्च २०१८ रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून भविष्यात वाचन चळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भागीरथी वाचनालयासाठी धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी महिला संस्थाकोल्हापूर  यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या टप्प्यात २५ हजार रुपयांची पुस्तके देण्यात आली आहेत. त्याचबरोबर लोकसहभागातून विविध पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, कथा, कविता, कादंबर्‍या आणि दिवाळी अंक, तसेच स्वयंसेवी, सामाजिक संस्था, प्रकाशन संस्था, दानशूर व्यक्ती आणि वाचक वर्गांनी मोठ्या प्रमाणात नवी आणि जुनी पुस्तके भागीरथी महिला संस्थेला भेट स्वरुपात देऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आणि वाचन चळवळीला हातभार लावला. सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांनी ग्रंथालय चळवळीच्या इतिहासात एक क्रांतिकारक पर्व उभे केले आहे; त्यामुळे त्यांचे मराठी साहित्य विश्वातील योगदान कोणालाच विसरता येणार नाही. त्यांच्या या विशेष विक्रमाची नोंदमहाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् या संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील दादा पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.या प्रसंगी लेखिका सोनाली नवांगुळ, प्रभा भागवत, माजी महापौर सई खराडे, मनीषा जाधव, जिग्ना वसा, अवनी शेठ, तेजस्विनी घोरपडे, सविता शिंदे, डॉ. प्रिया दंडगे सुवर्णा गांधी, सौ. संजीवनी सुनील पाटील, नगरसेविका, विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी, भागीरथी संस्थेच्या सभासद उपस्थित होत्या. आभार शरयू भोसले यांनी मानले.