कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अनंतात विलिन, शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

0
13

खामगाव,दि.01- राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर शुक्रवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. फुंडकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच दिग्गज नेत्यांनी आणि हजारो नागरिकांनी पांडुरंग फुंडकर यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या निधनाने खामगाववर शोककळा पसरली आहे.

कृषीमंत्री फुंडकर यांना बुधवारी (30 मे) रात्री मुंबईतील के. जे सोमय्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते रात्री साडे बाराच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली. साधारणपणे वीस दिवस आधी भाऊसाहेब फुंडकर यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. त्यावेळी प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून सकाळी दहा वाजता त्यांना के जे सोमय्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. रात्री आठ वाजता पुन्हा श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला आणि रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली.साधारणपणे वीस दिवस आधी भाऊसाहेब फुंडकर यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. त्यावेळी प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून सकाळी दहा वाजता त्यांना के जे सोमय्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.  पण रात्री आठ वाजता पुन्हा श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला आणि रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ सुनीता फुंडकर, मुलगा सागर  फुंडकर त्यांचे नजिकचे स्नेही अनिलभाई राजभोर तसेच अन्य नातेवाईकही हजर होते. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली.