१२ ऐवजी १८ महिने प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यकाळ

0
14

मुंबई – आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंचे पद रिक्त झाल्यानंतर प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यकाळ १२ ऐवजी १८ महिने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमानुसार विद्यापीठाच्या कुलगुरुचे पद रिक्त झाल्यापासून १२ महिन्यांसाठी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात येत होती. अधिनियमात दुरुस्ती केल्यामुळे हा कालावधी आता १२ महिन्यांवरुन १८ महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. विजय ऐंचवार निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली होती. प्रभारी कुलगुरूंची मुदत ५ मार्च २०१५ रोजी संपणार आहे. नवीन कुलगुरुंची नियुक्तीसाठी शोध समिती गठित करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या प्रतिनिधींचे नाव राज्यपालांना कळविण्यात आले आहेत. मात्र, गोंडवाना विद्यापीठाच्या पहिल्या व्यवस्थापन परिषद आणि विद्यापरिषदेची स्थापना अद्याप झालेली नसल्यामुळे शोध समिती गठित होणे, त्याद्वारे कुलगुरुंच्या नियुक्तीकरिता उमेदवारांची नावे मागविणे आणि छाननीद्वारे कुलगुरुंच्या नियुक्तीची कार्यवाही मार्चपूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे हा पेच सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.