सोशल मिडीया आव्हान नसून संधी-प्रकाश जावडेकर

0
13

नवी दिल्ली- सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव हे आव्हान न मानता त्याला संधी मानून शासनाचा प्रभावी जनसंपर्क करण्याचे आवाहन केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर यांनी केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने शासनातील जनसंपर्क विषयावरील वायएमसीए होस्टेल येथे आयोजित राष्ट्रीङ्म कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, नॅशनल पब्लीक रिलेन्स सोसायटीचे अध्यक्ष अजित पाठक, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, शासनाचे कार्य प्रभावी भाषेद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यावर जनसंपर्क खात्याचा भर असला पाहिजे त्यासाठी जनसंपर्क कार्याचा वेळोवेळी आढावा व मूल्यमापन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात लमाण, वैदू, धोबी आदीं समाजाच्या तर मणिपूर व अन्य राज्यात आदिवासी समाजाच्या मोठ्या स्वरूपात भरणा-या यात्रा हे शासनाचा जनसंपर्क करण्याचे महत्वाचे व्यासपीठ ठरू शकते, अशा ठिकाणी स्थानिक व सोपी भाषा वापरून उत्तम जनसंपर्काद्वारे शासनाचा संदेश पोहचविणे गरजेचे आहे.
वर्तमानकाळात उपलब्ध सर्वच प्रसार माध्यमांचा उपयोग करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगत, जावडेकर यांनी कल्पक व कार्यक्षमपणे शासनाचा संदेश पोचवविण्यासाठी प्रशिक्षण उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन केले. जनसंपर्क विभाग हा शासनाची शान व मान राखणारा सैनिक असतो तेव्हा या यंत्रणेत कार्य करणा-या प्रत्येकाने जबाबदारी व कल्पकतेने कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.आधुनिक माध्यमांच्या युगात शासनाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यात कार्यरत या यंत्रणेतील अधिका-यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.चंद्रशेखर ओक यांनी आपल्या भाषणात या कार्यशाळेद्वारे राज्या-राज्यांतील जनसंपर्क माध्यमांच्या पध्दतीची ओळख व नवनवीन संकल्पनेची देवाण-घेवाण होऊन शासनाचा प्रभावी जनसंपर्क होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. आधुनिक प्रसार माध्यमांच्या काळात प्रभावी जनसंपर्कासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन गरजेचे असून महाराष्ट्र परिचय केंद्राने पुढाकार घेवून केलेल्या आयोजनाचे कौतुक त्यांनी केले.
उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यशाळा आयोजना मागील भूमिका आपल्या प्रास्ताविक भाषणात विषद करून कार्यशाळेचा लाभ महाराष्ट्रासह विविध राज्यांतील सहभागी अधिका-यांना होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
या कार्यशाळेसाठी मणिपूर, आसाम, गोवा, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, केरळ, राजस्थान या राज्यांतील जनसंपर्क विभागाचे अधिकारी तसेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि आकाशवाणीच्या अधिकाèयांसह महाराष्ट्रातून गोंदिङ्माचे जिल्हा महिती अधिकारी विवेक खडसे, नागपुरचे अनिल ठाकरे, भंडाèङ्माच्ङ्मा मनिषा साबळे, चंद्रपुरचे रवी गिते, ङ्मुवराज पाटील ङ्मांच्ङ्मासह २० जिल्हा माहिती अधिकारी सहभागी झाले आहेत.