तिरोड्याचे आमदार रहांगडालेनी जिल्हाधिकाèयासोबत केली पाहणी

0
8

गोंदिया-गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.सर्वाधिक नुकसान तिरोडा विधानसभा क्षेत्रातील गावात झाले असून तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला योग्य तो अहवाल राज्यसरकारकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या.इंदोरा बूज.गोंडमोहाडी,परसवाडा,खोपडा आदी गावामध्ये मोठे नुकसान झाले आहे.आमदार रहागंडाले,जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी,सीईओ दिलीप गावडे,उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे,बीडीओ जमईवार,तहसीलदार आधंळे यांच्यासह सरपंच राजेश रहांगडाले,जिल्हा परिषद सदस्य योेगेंद्र भगत यांनी नुकसान झालेल्या गहू व हरभरा पिकाची पाहणी केली.तसेच पालकमंत्री राजकुमार बडोले,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मुंबई येथे भेटून माहिती देणार असल्याचेही सांगितले.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने कडधान्य व बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शेतकèयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर ङ्मांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, संततधार पावसाने जिल्ह्यातील गहू, हरभरा, लाखोडी, जवस, पोपट, तूर, मूग, उडद या कडधान्यासह बागायती भाजीपाला शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अवर्षणाङ्कुळे नुकसान परिस्थितीत शेतकèयांना योग्य मदत व मोबदला देण्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही जाहीर केले आहे. तरी जिल्ह्यातील शेतीचे सव्र्हेक्षण करून नुकसानीचे पंचनामे करावे व योग्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करून सविस्तर चर्चा करण्यात आली.