राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना सिरप देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन- राम शिंदे

0
8

मुंबई –जिल्हा परिषद शाळांमध्ये केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना औषधी गोळ्यांऐवजी सिरप देण्यात यावे असे शासनाच्या विचाराधीन असून यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेतंर्गत गोळ्या दिल्यानंतर 85 विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊन एका विद्यार्थीनीच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप चिखलीकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या घटनेत मृत पावलेल्या विद्यार्थींनीच्या कुटुंबियास राजीव गांधी विद्यार्थी अर्थसहाय्य योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्याबाबत तपासणी करुन कार्यवाही करण्यात येईल. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य बच्चू कडू यांनी चर्चेत सहभाग घेतला.