विठ्ठल मंदिराच्या गाभा-यात 6 वर्षीय मुलीला सर्पदंश

0
10

पंढरपूर- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 6 वर्षाच्या मुलीला सर्पदंश झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. संबंधित मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दंश केलेला सर्प विशेष विषारी नसल्याने मुलीचे प्राण वाचल्याचे कळते.
याबाबतची माहिती अशी की, बिहारमधील एक कुटुंब बुधवारी दुपारी पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाला आले होते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरातील गाभा-याजवळ रांगेत उभे असताना अचानक पायाखाली एक साप आला. मुलीने पाय उचलताच सापाने चावा घेतला. त्यानंतर मुलीला तिच्या कुटुंबियांनी पंढरपूरमधील सरकारी रुग्णालयात दाखल केले.

बिहारमधील सिवान येथील रमेशकुमार सिंह हे सध्या चाकूर येथील बीएसएफ केंद्रात सेवेत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी काल दुपारी ते पत्नी आणि 6 वर्षाची मुलगी नयनसी कुमारीसोबत पंढरपूरात आले होते. त्याचवेळी विठ्ठलाच्या गाभा-याजवळ आल्यावर दर्शन घेताना अचानक मुलगी साप चावला.