भटक्या कुत्र्यांचा महादेव जानकरांवर हल्ला

0
8

मुंबई: चिमुकल्यांचा चावा घेणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर गोरेगावच्या नागरी निवार प्रकल्प परिसरात हल्ला केला. जानकर भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कांदिवली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भटक्या कुत्र्यांची दहशत मुंबईसह उपनगरांत वाढली असून नागरी निवार प्रकल्प परिसरातही हीच परिस्थिती आहे. येथे एका व्यक्तीला कुत्रा चावत असल्याचे जानकर यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी मदतीसाठी गेलेल्या जानकरांनी, कुत्र्यांच्या दिशेने दगड भिरकावले. यावेळी कुत्र्यांनी आपला मोर्चा वळवून थेट जानकरांवरच हल्ला चढवला.