‘द ग्लोबल वुमन अचीव्हर अवार्ड २०१९’ ची धमाकेदार सांगता

0
21

डीवायके हेल्थ ग्रुपने केला ४४ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान.

मुंबई,( के .रवि ), २० जुन:- जागतिक पितृदिनाचे औचित्य साधून ‘द ग्लोबल वुमन अचीव्हर अवार्ड २०१९’ आयोजन करण्यात आले होते महिलांना त्यांच्या वडिलांसोबत आमंत्रित करण्यात आले होते ही या कार्यक्रमाची खासियत होती. यामध्ये सायना नेहवाल आणि तिचे वडील हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यासोबतच समाजात महिलांद्वारे निभावण्यात येणाऱ्या असंख्य भूमिकांबाबत गौरवोद्गार काढण्यात आले आणि त्यांचे सशक्तीकरण सुनिश्चित करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याकरीता आवाहन करण्यात आले.

आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या डीवायके हेल्थ ग्रुपने स्वकर्तृत्वाने आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या ४४ महिलांचा सन्मान केला. यामध्ये बैडमिंटनपटू सायना नेहवाल, ऑस्कर पुरस्कार विजेत्या गुनीत मोंगा, सोशल एक्टिविस्ट अमला रुइया, सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान आदी मान्यवर महिलांचा समावेश आहे. डीवायके हेल्थ ग्रुप सोबत युनिटी मिशन फौंडेशन आणि जीएलके ग्लोबल इवेन्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा करण्यात आला. या भव्य समारोहामध्ये वेटरन सिंगर अलामेलू मनी यांना लाइफ टाइम अचीवमेंट अवार्डने सम्मानित करण्यात आले. पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफ़ा खान यांच्या हस्ते सन्मानकर्त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपले मनोबल खच्ची न होऊ देता कठोर परिश्रमाने आपापल्या क्षेत्रात सफलता प्राप्त करून समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिलांचा हा सन्मान समारोह ‘द ग्लोबल वुमन अचीव्हर अवार्ड २०१९ मुंबईत पार पडला. यावेळी एलआईसीचे मुख्य प्रबंधक हेमंत भार्गव आणि सुप्रसिद्ध गायक श्री हरीहरन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी सायना नेहवाल यांच्या हस्ते डीवायके हेल्थ अॅपचे देखील अनावरण करण्यात आले आणि त्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

अभिनेत्री प्रीतिका राव, हेल्थ एंड फिटनेस ट्रेनर अंजलि मुखर्जी आणि शालिनी भार्गव आरजे आकृति सहभागी झाल्या. त्यासोबतच आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉक्टर ऋतु गिरिधर, कठुआ केस मधील चर्चित वकील दीपिका राजावत, संगीत क्षेत्रातील सुधा मनियन यांना सन्मानित करण्यात आले तसेच न्यूज नेशन या न्यूज चॅनलच्या पत्रकार श्वेता जया यांना जर्नलिस्ट ऑफ द ईयर अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. यासोबतच कॅनडावरून आलेली ऐक्ट्रेस मन्नू संधू, पॉप सिंगर अनामिका ग्रोवर आणि ट्रांसजेंडर ऐक्टिविस्ट गौरी सावंत यांना देखील त्यांच्या क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. बॅंकिंग क्षेत्रातील मोनिका कालिया आणि लिटरेचर लीजेंड श्रीमती पुष्पा भारती आणि सुनीता बुद्धिराजा यांची उपस्थिती समारंभाची शोभा वाढवली.

जागतिक पितृदिनाच्या निमित्ताने या महिलांनी साहस, लढाऊपणा आणि मेहनत यांविषयी चर्चा करण्यासोबतच यशाच्या वाटेवर चालण्यासाठी योगदान देणाऱ्या आपल्या वडिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी खूप प्रशंसा केली. या अर्थाने महिलांना प्रेरित करणाऱ्या आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या पुरुषांनादेखील हा सन्मान समर्पित होता.