कृषी पिक विमा योजनेच्या नावाखाली शेतकèयांची लूट-नरेंद्र भोंडेकर

0
14

भंडारा ,दि.20ः- राज्यात व देशाच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्यावतीने प्रधानमंत्री कृषी पिक विमा योजनेच्या नावाखाली संबंधित विमा कंपनीकडून शेतकèयांची लूट करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. कृषी विभाग व विमा एजंसीची साठगाठ असल्याने शेतकèयांना कृषी पिक विमा योजनेचा लाभ मिळत नाही. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात एकाही शेतकèयाला पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. यामुळे होत असलेली शेतकèयांची पिळवणूक थांबविण्याकरीता २२, २३ व २४ जून रोजी शिवसेनेच्यावतीने प्रत्येक तहसिल कार्यालयासमोर शेतकरी मदत केंद्र उघडण्यात येणार आहे. यात शेतकèयांच्या तक्रारी गोळा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

यावेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायधने उपस्थित होते. नरेंद्र भोंडेकर पुढे म्हणाले, सन २०१७-१८ मध्ये खरीप हंगाम प्रधानमंत्री पिक विमा योजननेसाठी भात व सोयाबीन मिळून ६६१६८.४४ हेक्टर जमिनीचा ६८२७० सभासदांचा ५ कोटी १६ लक्ष रुपयाचा विमा हप्ता काढण्यात आला होता. यात २५ कोटी ८०७ लक्ष विमा संरक्षित होता. प्रत्यक्षात ३५७२३ शेतकèयांना ३१ लक्ष ११७ हजाराची नुकसान भरपाई देण्यात आली. सन २०१८-१९ मध्ये भात व सोयाबीन मिळून ५६७६३.५६ हेक्टर जमिनीचा ६४४२० सभासदांचा ३ कोटी ९७ लक्ष रुपयाचा विमा काढण्यात आला होता. यात १९ कोटी ८६२ लक्ष रुपयाचा विमा संरक्षित होता. मात्र प्रत्यक्षात एकाही शेतकèयाला नुकसान भरपाई मिळाली नाही, असेही ते म्हणाले. कृषी विभाग विमा कंपनीच्या फायद्यासाठी चुकीचा सव्र्हे करतात.

कंपनीसोबत असलेल्या देवाणघेवाणीतून चुकीची माहिती देतात. परिणामतः शेतकèयांचे नुकसान होत आहे. यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपातळीवर २२, २३ व २४ जून रोजी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालु्नयात शेतकरी मदत केंद्र उघडण्यात येणार आहे. यात शेतकèयांच्या तक्रारी गोळा करून त्या मुख्यमंत्री व पालकंत्री यांचेकडे देण्यात येणार आहेत. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर, खा. कृपाल तुमाने व आशिष जयस्वाल हे जिल्ह्यात येणार असून अनेक शेतकèयांच्या भेटी घेणार आहेत. जिल्हयातील शेतीविषयक विद्यमान परिस्थितीचे ते अवलोकन करणार असल्याची माहितीही माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली.