४१ लोकसेवकांची उघड चौकशी

0
23

पुणे–अवैध संपत्ती जमा केल्याची तक्रार आल्यानंतर लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) पुणे विभागातील ४१ अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू केली आहे.राज्यात सध्या ३४५ लोकसेवकांची उघड चौकशीची प्रकरणे सुरू आहेत. यामध्ये १९८ लोकसेवकांची उघड चौकशी करण्यासाठी महासंचालकांनी परवानगी दिली आहे. तर, १४७ प्रकरणांमध्ये उघड चौकशीला परवानगी दिली आहे.
पुणे विभागातील उघड चौकशी सुरू असलेल्यांची नावे अशी :
मिलिंद भागीनाथ कपिले (कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड मनपा), नितीनकुमार गोकावे (पोलीस निरीक्षक, पुणे ग्रामीण), रामचंद्र नामदेव जाधव (शिक्षण प्रमुख शिक्षण मंडळ, पुणे मनपा), दादाभाऊ सोनू तळपे (उपसंचालक, भूमी अभिलेख), व्ही. डी. खानंदे (सहसंचालक हिवताप व हत्तीरोग), अजित पाटील (पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी), सुरेश तुकाराम राऊत (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग), बाबासाहेब दादासाहेब कोळी (पोलीस निरीक्षक, पुणे शहर गुन्हे शाखा), रामभाऊ दत्तात्रय थोरात (निवृत्त सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर), श्री. मळेकर (अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग), बाळासाहेब ऊर्फ चंद्रकांत विठ्ठल शिवरकर (माजी मंत्री, पुणे), यशवंत दादासाहेब ओंबासे (निवृत्त पोलीस निरीक्षक), प्रशांत शेळके (उपजिल्हाधिकारी), भीमाशंकर पुरी (अधीक्षक अभियंता, कुकडी प्रकल्प मंडळ), ज्ञानेश्वर कारभारी दिघे (तालुका कृषी अधिकारी, हवेली), चंद्रकांत कुंजीर (सहायक प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसरी आंबेगाव), गिरजू जावजी बांबळे (सेवानिवृत्त सहसंचालक, निबंधक), सुरेश नामदेव अंबुलगेकर (विभागीय कृषी संचालक), रामदास जगन्नाथ पारगे (सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा), राजेंद्र जाधव (नगर अभियंता मिरज), सुनील अप्पासाहेब चव्हाण (कनिष्ठ अभियंता, मराविवि कंपनी मर्यादित सांगली), राहुल विठ्ठल खाडे (शाखा अभियंता पाटबंधारे विभाग, सांगली), अजित अण्णाप्पा कागी (कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सांगली), सुरेश लक्ष्मण पाटील (मुख्य अभियंता जलसंपदा विभाग), कुमार माने (प्रभारी अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ), रणजित पांडुरंग देसाई (तहसीलदार राधानगरी), रघुनंदन हिंदुराव सावंत (जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर), मल्लिनाथ वीरभद्रप्पा खद्दे (कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सांगली) आणि विजय गणपत कुंभार (पोलीस निरीक्षक, सांगली)