भंडारा जिल्हाधिकारीपदी धीरजकुमार,तर सौ.खोडे आदिवासी विभागाच्या उपायुक्त

0
9

भंडारा,दि.14- येथील जिल्हाधिकारी श्रीमती माधवी खोडे यांची नागपूर येथील अादिवासी विभागाच्या उपायुक्त पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नांदेडचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची बदली झाल्याचे आदेश राज्याचे अपर मुख्य सचिव (सेवा) डॉ.भगवान सहाय यांनी जारी केले आहेत.तर नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य संचालक पदावर बदली करण्यात आली आहे.सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांना नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुलरंजन यांची परभणी येथे तर परभणीचे जिल्हाधिकारी सच्रिदंप्रताप यांची यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.