हमीभाव वाढीचा प्रश्न केंद्राच्या कोर्टात-पालकमंत्री

0
8

धानाला अडीचशे रुपयांची प्रोत्साहन मदत
पालकमंत्री राजकुमा बडोले यांची पत्रपरिषदेत माहिती

गोंदिया,दि. १४ : नैसर्गीक आपत्तीमुळे राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आङे. त्यामुळे शेतकèयांना मदत म्हणून िक्वटलमागे अडीचशे रुपये प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. खरीप पणन हंगामात सुमारे २५ लक्ष िक्वटल धानाची खरेदी होणार आहे. त्याकरिता शासन प्रोत्साहन राशीपोटी सुमारे ६२.५० कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. धान उत्पादक शेतकèयांना साडेसात हजाराची सरसकट मदत आणि धानाच्या हमीभाववाढीसंदर्भात मात्र त्यांनी हमीभावाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यावर सांगता येत नसल्याचे सांगत विरोधी पक्षात असताना केलेल्या मागणीचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते आज, गुरुवारी बोलत होते. मंत्री बडोले पुढे म्हणाले, आधारभूत qक‘त खरेदी योजना केंद्र शासनाची असून ती शेतकèयांच्या हितासाठी आहे. खरीप पणन हंगाम २०१३-१४ करीता केंद्र शासनाने धानाची आधारभूत किमंत साधारण धानाकरिता १३६० आणि १४०० रुपये एवढी ठेवली. चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तींमुळे धआन उत्पादक शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे शेतकèयांना प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याकरिता राज्य शासनाच्या तिजोरीवर ६२.५० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सरसकट हेक्टरी साडेसात हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भात काय झाले? अशी विचारणा पत्रकारांनी त्यांना यावेळी केली. दरम्यान मंत्री बडोले यांनी उत्तर देण्याचे टाळत त्यासंदर्भात राज्यशासनाने निर्णय घेतला नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसची सत्ता असताना भारतीय जनता पक्षाने धानाला साडेतीन हजार रुपये दर देण्यात यावा, याकरिता अनेकदा मोर्चे काढले, आंदोलने केली, त्याची अमलबजावणी भाजप सरकार केव्हा करणार असा सवाल उपस्थित केला असता तो विषय केंद्र शासनाचा असल्याचे सांगून बडोले यांनी मौन बाळगले.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व जाती, धर्माच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण गोंदिया येथे १९ आणि २० मे रोजी देण्यात येणार आहे. त्याकरिता मोठ्या संख्येने बेरोजगार तरूण-तरूणींनी उपस्थित राहावे, यावेळी अनेक संस्थां मार्पत रोजगार पुरविण्यात येणार आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य विकासातून नोकरिकरिता बेरोजगारांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री बडोले यांनी याप्रसंगी केले. त्यांच्यासोबत यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,महासचिव विरेंद्र अंजनकर,भरत क्षत्रिय ,दिपक कदम,संतोष चव्हाण,रेखलाल टेंभरे उपस्थित होते.