विधानसभा नियम समितीवर सदस्यांची नामनियुक्ती

0
11

मुंबई, दि.15 : विधानसभा नियम समितीवर (2015-16) सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे या समितीचे पदसिध्द प्रमुख आहेत. या समितीवर विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण, प्रशांत ठाकूर, ॲड. आशिष शेलार, अतुल भातखळकर, नरेंद्र पवार, ज्ञानराज चौगुले, ॲड.गौतम चाबुकस्वार, डॉ.पतंगराव कदम, दिलीप सोपल, गणपतराव देशमुख यांची सदस्य म्हणून नामनियुक्ती करण्यात आली आहे.