पेट्रोल ३ तर डिझेल अडीच रुपयांनी महाग,अच्छे दिनची सुरवात

0
7

नवी दिल्ली, दि. १५ – सर्वसामान्य जनता ‘अच्छे दिनां’च्या प्रतीक्षेत असतानाच पेट्रोलियम कंपन्यांनी त्यांना दरवाढीचा दणका दिला आहे. पेट्रोलच्या किमतीत ३ रुपये १३ पैशांची तर डिझेलच्या किमतीत २ रुपये ७१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. गेल्या महिन्याभरात इंधनांच्या किमतीत दुस-यांदा दरवाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मात्र या ‘महागाई’चे चटके सोसावे लागणार आहेत.