आदर्श गाव योजनेच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन

0
9

मुंबईदि.२०:-ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे आदर्शगाव योजनेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांच्या पुस्तिकेचे प्रकाशन मंगळवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृह येथे करण्यात आले. योजना अधिक यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक सूचनावलीत काही बाबींचा समावेश करण्यात आला असून या योजनेंतर्गत राज्यातून 18 मे 2015 पर्यंत 66 गावांची निवड झाली आहे. लोकसहभागातून ग्रामविकास व लोकाभिमुख कार्यक्रमात शासनाचा सहभाग या संकल्पनेवर ही योजना आधारलेली असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात लोकांच्या सक्रिय सहभागातून किमान एक पथदर्शक गाव निर्माण करणे व त्यानंतर इतर गावांना त्यांचे गाव आदर्श करण्यासाठी प्रेरित करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. यावेळी आदर्श गाव योजना समितीचे उपाध्यक्ष विजय शिवतारे, कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जलसंधारण व रोहयोचे सचिव प्रभाकर देशमुखआदी उपस्थित होते.