कमलापूरजवळ पोलिस-नक्षल चकमक

0
18

गडचिरोली,दि.२०:अहेरी तालुक्यातील कमलापूरनजीकच्या आशा तलावाजवळ आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. मात्र या चकमकीत कुणीही जखमी झाले नाही.आज सकाळी केंद्रीय राखीव दल व सी-६० पथकाचे जवान संयुक्तरित्या नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. मात्र पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीत कोणतीही हानी झाली नाही.