बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा विभागात प्रथम,तर गोंदिया द्वितीय

0
35

गोंदिया,दि.२७- राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकाल बुधवारी जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९५.६८ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (८८.१३ टक्के) लागला आहे.यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली असून ९४.२९ टक्के विद्यार्थीनी तर ८८.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकाल बुधवारी जाहीर झाला.विभागवार निकाल खालील प्रमाणे आहेत :कोकण – ९५.६८ टक्के,पुणे – ९१.९६ टक्के,कोल्हापूर – ९२.१३ टक्के,मुंबई – ९०.११ टक्के,औरंगाबाद – ९१.७७ टक्के,लातूर – ९१.९३ टक्के,अमरावती – ९२.५० टक्के,यवतमाळ – ९२ टक्के,नागपूर – ९२.११ टक्के,नाशित ८८.१३ टक्के.
नागपूर विभागीय मंडळाचा १२वी चा निकाल आज जाहीर झाला असून नागपूर विभागाचा ९२.११ टक्के निकाल लागला. यात विज्ञान शाखेचा ९६.७६ टक्के,कला शाखेचा ८८.१६ टक्के,वाणिज्यशाखेचा ९१.५३ टक्के आण व्होकेशनल शाखेचा ८९.४४ टक्के निकाल लागला आहे.गोंदिया जिल्ह्याचा ९३.९४ टक्के निकाल लागला असून विभागात दुसरा आहे. विज्ञान शाखेचा ९७.२५ टक्के,कला शाखेचा ९१.६५ टक्के,वाणिज्य शाखेचा ९०.६८ व व्होकेशनल शाखेच ८६.७५ टक्के निकाल लागला.भंडारा जिल्ह्याचा ९४.६८ टक्के निकाल लागला असून विभागात पहिला आहे.विज्ञान शाखेचा निकाल ९८.२२ टक्के,कला शाखेचा निकाल ९१.०१ टक्के,वाणिज्य शाखेचा निकाल ९४.१५ टक्के व व्होकेशनल शाखेचा निकाल ९४.०१ टक्के लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९२.१० टक्के,नागपूर ९२.६८ ,वर्धा ८८.८६ आणि गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे
विशेष म्हणजे विभागातून जर्मन,qसधी,फें्रच,बंगाली,चित्रकला,डिझाईन,संगीत,क्राप प्राड्क्शन,माहिती तंत्रज्ञान,सामान्य स्थापत्य अभियांत्रिकी,ऑफिस मॅनेजमेंट,संगणक तत्रज्ञ,दुग्धव्यवसाय,कुकुटपालन,बँकीग,पर्यटन व सहल तंत्रज्ञ आदी ५० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.मराठी भाषेचा निकाल ९६.१७ टक्के लागला आहे.
भंडारा जिल्ह्यात ९२.९२ टक्के मुले तर ९६.३२ टक्के मुली.चंद्रपूर जिल्ह्यात ९०.०७ टक्के मुले तर ९४.१२ टक्के मुली.नागपूर जिल्ह्यातून ९०.१० टक्के मुले व ९५.१८ टक्के मुली.वर्धा जिल्ह्यातून ८८.५७ टक्के मुले व ९१.९८ टक्के मुली.गडचिरोली जिल्ह्यातून ८६.७८ टक्के मुले व ८९.४२ टक्के मुली आणि गोंदिया जिल्ह्यातून ९२.५८ टक्के मुले व ९५.२८ टक्के मुली उत्र्तीण झाल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील १७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.त्यामध्ये तिरोडा तालुक्यातील एस.एन.कनिष्ठ महाविद्यालय सरांडी,सडक अर्जुनी तालुक्यातील जीईएस कनिष्ठ महाविद्याल सडक अर्जुनी, हिरालाल जैन क.महाविद्यालय खोबा /हलबी,बनारसीदास अग्रवाल क.महाविद्यालय सडक अजुऱ्नी.गोरेगाव तालुक्यातील किरसान मिशन क.महाविद्यालय गोरेगाव.देवरी तालुक्यातील शासकीय पोस्टबेसीक मुलींची आश्रमशाळा बोरगाव बाजार.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील श्री सम्राट अनुदानित आदिवासी उच्च माध्य.आश्रमशाळा,आदिवासी विकास क.महाविद्याल झाशीनगर,भगीरथीबाई डोंगररवार क.महाविद्यालय नवेगावबांध,मिलीदं कला क.महाविद्यालय बाक्टी चान्ना.आमगाव तालुक्यातील संत जयरामदास क.महाविद्यालय ठाणा.गोदिया तालुक्यातील फुडे विज्ञान क.महाविद्यालय फुलचूर,प्रोगेसिव्ह हायर सेकंडरी स्कूल गोंदिया,मनोहरभाई पटेल सैनिक हायस्कूल गोंदिया,ए.जी.अग्रवाल,क.महाविद्यालय फूलचूर.विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया,शांताबाई मनोहरभाई पटेल ज्यू.कॉलेज गोंदिया या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.