केंद्र सरकारचे अपयश घराघरांत पोहोचवा

0
19

भंडारा : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत जनतेची दिशाभूल करणार्‍या आणि शेतमजूर, शेतकर्‍यांना घातक ठरणारा भूमी अधिग्रहण कायदा, काळा पैसा, अन्न धान्याची कपात, विद्यार्थ्यांना न मिळणारी शिष्यवृत्ती, धानाची कमी भाव, पेट्रोल व डिझेलचे वाढलेले दर याची माहिती घराघरापर्यंत पोहचवा, असे आवाहन काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी केले.
जिल्हा काँग्रेस, तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित केंद्र सरकारच्या प्रथम पुण्यतिथी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजकुमार मेश्राम, एनएसयुआयचे जिल्हाअध्यक्ष भूषण टेंभुर्णे, युकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष प्रसन्ना चकोले, अनिक जमा, नितीन बागडे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, गणेश लिमजे, रहमान पटेल, सिंधू बोरकर, मुकुंद साखरकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष जिया पटेल म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या निकृष्ट कामगिरीचा प्रचार करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराची सुरुवात करावी, असे आवाहन केले. यावेळी प्रसन्ना चकोले, सुनिल लेंडे, भूषण टेंभुर्णे, राजकुमार मेश्राम, नितीन बागडे, अनिक जमा, सीमा भुरे यांची भाषणे झाली. यावेळी संजय वरगंटीवार, शालीक भुरे, रुपेश खवास, प्रकाश वाढवे, अशोक कापगते, सचिन हिंगे, योगेश्‍वर बडगे, आनंद तिरपुडे, चोलाराम गायधने, प्रेमदास वनवे, मंगेश हुमणे, सुभाष बोरकर, प्यारेलाल वाघमारे, रमेश मते, नागेश्‍वर ठवकर, जनार्धन निंबार्ते, भाविका उके, अयुब पटेल, मधुकर बावनकुळे, निखील कुंभलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन राजकपूर राऊत यांनी तर आभारप्रदर्शन मंगेश हुमणे यांनी केले.