युती सरकारमधील आमदारांचा पहिला दौरा चीनचा

0
16

मुंबई,दि. १५: – राज्यातील आमदारांचे गेले पाच वर्षे बंद झालेले विदेश दौरे पुन्हा सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.विशेष म्हणजे हा दौरा चीनचा राहणार आहे.या दौर्यात सर्वच पक्षातील आमदारांचा समावेश राहणार आहे.त्यातच काँग्रेस काळात विदेशवारीला विरोध करणारे शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे आता सत्तेत असून ते गप्प राहतात काय याकडे लक्ष लागले आहे.सध्याच्या परिस्थितीतही मराठवाडा व पशि्चम महाराष्ट्राची तशी काही फारसी चांगली परिस्थीती नसताना विदेश दौरा .त्यातही आजपर्यंत झालेल्या विदेशवारीतून किती आमदारांनी आपल्या मतदारसंघात बदल घडवून आणला याचा सोशल आॅडीट व्हायला हवे.
त्यातच आमदारांनी विदेशात गेले पाहिजे. तेथील लोकशाही व्यवस्था व तंत्रज्ञान याचा अभ्यास केला पाहिजे. मीडियानेही या दौऱ्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे फडणवीस यांनी अलीकडेच विधिमंडळातील एका कार्यक्रमात स्पष्ट केल्याने आमदारांना विदेशवारीची इच्छा जागृत झाली आहे.2009 मध्ये झालेल्या दौर्यात आमदारांनी मारहाण केली होती.तो दौरा सुध्दा गाजला होता.त्यानंतर काँग्रेस प्रणीत सरकारमध्ये २०१० साली आमदारांचा शेवटचा विदेश दौरा युरोपात झाला. २०११ साली पुन्हा दौऱ्याची जुळवाजुळव सुरू झाली तेव्हा महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना आमदारांच्या विदेश दौऱ्यावर पैशाची उधळपट्टी कशाला, असा सवाल उपस्थित करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्याला विरोध करताना शिवसेनेचे आमदार दौºयात सहभागी होणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दौरा रद्द केला होता. त्यानंतर गेली पाच वर्षे आमदारांचे दौरे बंद झाले. आता मुख्यमंत्र्यानीची हिरवी झेंडी दाखवली आहे. आमदारांचा दौरा चीनला महाराष्ट्रातील आमदार राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून आपला पहिला दौरा चीनला करतील, असे मुख्यमंत्री यांनी रविवारी स्पष्ट केले.