आदिवासी विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता

0
13

मुंबई,दि.२७-राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता आढळून आली असून, ई-टेंडर पद्धतीने केलेल्या या खरेदीवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेतली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांचे एकाहून एक प्रताप समोर येत असल्याने फडणवीस यांच्यापुढे वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.१० कंत्राटदारांनी निविदा भरल्या; पण एका विशिष्ट कंत्राटदारालाच कंत्राट मिळावे यासाठी अटी व शर्ती बदलण्यात आल्या. याबाबत काही कंत्राटदारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या खरेदी प्रक्रियेबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशीचे आदेश दिले.