महाराष्ट्रातल्या ९८ उमेदवारांनी मारली UPSC मध्ये बाजी;अबोली निरवणे प्रथम

0
13

मुंबई, दि. ४ – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या किंवा UPSCच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातल्या ९८ जणांनी बाजी मारली असून ९८व्या स्थानावर आलेल्या अबोली नरवणेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. प्रंचड मेहनतीबरोबरच नृत्याची आवड जोपासणा-या अबोली नरवणेने रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे.यूपीएससीत पहिल्या पाचात चार मुली आहेत. त्यात इरा सिंघलने देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. रेणू राज, निधी गुप्ता, वंदना राव या अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि सुहर्ष भगत पाचवा आला आहे.
यूपीएससीमध्ये 1264 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील 590 ओपन, 354 ओबीसी, 194 एससी, 98 एसटी प्रवर्गातील आहेत. पहिल्या चारमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
यूपीएससी उत्तीर्ण 1364 उमेदवारांपैकी 180 जणांना आयएएस, 32 आयएफएस, 150 आयपीएस, 710 सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ए आणि 292 ग्रुप बी सर्व्हिससाठी निवडले जाणार आहेत. 254 उमेदवारांना राखीव यादीत ठेवले जाईल.
यूपीएससी मुलाखती झाल्यानंतर चार दिवसांत निकाल जाहीर होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती 27 एप्रिल ते 30 जून दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
देशाभरतील 59 केंद्रातून 2137 ठिकाणी गेल्या वर्षी 24 ऑगस्ट रोजी 9.45 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते. त्यापैकी 4 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 16,933 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी 16,286 विद्यार्थ्यांनीच मुख्य परीक्षा दिली होती. 13 मार्च रोजी मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला होता. त्यानंतर 3,308 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते.