नैतिक जबाबदारीतून गुंतवणुकीचे संरक्षण करावे- मुख्यमंत्री

0
8

मुंबई : देश-विदेशातील विविध क्षेत्रांतील मोठ्या कंपन्यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीला पसंती दिली असून मोठ्या गुंतवणुकीचा ओघ भारतात येत आहे. जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनण्याकडे देशाची वाटचाल सुरु आहे. या काळात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे व त्यांचा विश्वास टिकवून ठेवणे ही वित्त, कायदे व सुव्यवस्था क्षेत्रातील यंत्रणांची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग व इंडियन बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 7 व्या आर्थिक गुन्ह्यांविरोधी लढा या कार्यशाळेचे उद्घाटन श्री. फडणवीस यांच्या हस्ते हॉटेल ट्रायडंट येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा, अतिरिक्त संचालक वाय. सी. मोदी, इंडियन बँक असोसिएशनचे चेअरमन अश्वनी कुमार, व्हाईस चेअरमन श्रीमती अरुंधती भट्टाचार्य आदी उपस्थित होते.