खाद्यतेल महागणार! केंद्र सरकार

0
9

नवी दिल्ली – केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. जागतिक बाजारातील घसरत्या किमतीमुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारने कच्च्या खाद्य तेलावरील आयात शुल्क २.५ टक्क्यांवरून ७.५ टक्के तर रिफाइन्ड वनस्पती तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेले आहे. यामुळे देशातील खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. देशातील उद्योग आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.

कृषी मंत्रालयाने रिफाइन्ड तेलावरील आयात शुल्क सध्याच्या १० टक्क्यांवरून १२.५ टक्के करण्याचा प्रस्ताव दिला होता. अन्न मंत्रालय शुल्क १५ टक्के करण्याच्या बाजूने होते. कच्च्या खाद्य तेलावरील शुल्क मात्र २.५ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याची शिफारस दोन्ही मंत्रालयांनी केली होती. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले, कच्च्या तसेच रिफाइन्ड खाद्यतेलाच्या शुल्कातील फरक १० ते १२ टक्के असले असते, तर उत्तम ठरले असते. वनस्पती तेल उत्पादक असोसिएशनचे महासचिव एस.पी. कामरा यांनी सांगितले, की हा फरक १० टक्के असायला हवे. आयात शुल्कातील वाढीमुळे खाद्यतेलाच्या किमती किरकोळ प्रमाणात वाढतील.

भारतात खाद्य तेलाचा खप सर्वाधिक आहे. तसेच खाद्य तेलाचा भारत हा सर्वात मोठा आयातदार आहे. देशात दरवर्षी दोन कोटी टन खाद्यतेलाची विक्री होते. यापैकी ६० टक्के गरज आयातीतून भागवली जाते. गेल्या वर्षी ११८ लाख टनाची आयात झाली होती, हा आतापर्यंत विक्रम आहे.
युक्रेन आणि काळा समुद्र परिसरात सूर्यफुलाचे उत्पादन घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती वाढल्या आहेत. भारतात नोव्हेंबर ते ऑक्टोबर हा काळ तेल वर्ष असतो