हिवाळ्याच्या सुट्यांत गोवा, केरळला पहिली पसंत

0
16

मुंबई-यावर्षी हिवाळ्याच्या सुटीत देशात लोकांची पहिली पसंती गोवा केरळला आहे. जयपूर, सिमला, मनालीतील हॉटेलही फुल्ल बुक आहेत. गेल्या २५ वर्षांपासून हॉटेल व्यवसायात असलेल्या कीस हॉटेल्स अँड कीस रिसॉर्ट चेनचे मुख्य विक्री मार्केटिंग अधिकारी शोमू मुखर्जी यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ ते १७ टक्क्यांनी गर्दी वाढली आहे. गोव्यात एका रूमसाठी मारामार सुरू आहे, तर दुसरीकडे पृथ्वीवरील नंदनवन काश्मीरला पर्यटकांची प्रतीक्षा आहे. ३० टक्के सूट दिल्यानंतरही तेथील हॉटेल रिक्त आहेत. देशात गोवा, केरळ फेव्हरेट आहेत. विदेशात दुबई, थायलंड, मलेशिया, श्रीलंकेला जाणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
महाराष्ट्राततारकली, अजिंठा, वेरूळ फेव्हरेट : महाराष्ट्रातयेणाऱ्या देशी – विदेशी पर्यटकांचे हाॅट डेस्टिनेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारकली बीच आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांनी सांगितले की, तारकलीशिवाय पर्यटक गणपती पुळे (रत्नागिरी), अजिंठा -वेरूळला (औरंगाबाद) पसंती देत आहेत. विदेशी पर्यटक मुंबईच्या बीचला भेटी देत बॉलीवूड पर्यटनाला प्राधान्य देत आहेत. देशी पर्यटक शिर्डीसारख्या धार्मिक स्थळांना तसेच ऐतिहासिक किल्ल्यांनाही आवर्जून भेट देताना दिसत आहेत.