अवघ्या 10 दिवसांत घरी येईल तुमचा PASSPORT

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दि‍ल्‍ली- पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करणार्‍या अर्जदारांसाठी खुशखबर आहे. आता पासपोर्ट अवघ्या 10 दिवसांत अर्जदाराच्या घरी पासपोर्ट येईल. मात्र, यासाठी अर्जदाराला ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे अर्जदाराची या प्रक्रियेत कागदपत्रांसाठी (डॉक्युमेंट्स) धावपळीही होत नाही.

ओळख पत्र (आयडी प्रूफ) आणि घराचा पत्ता (अॅड्रेस प्रूफ) या सारखे डॉक्युमेंट ऐवजी फक्त एका आधारकार्डवरही काम होते. मात्र, त्यासाठी अर्जदाराकडे आधारकार्ड असणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्ज करतेवेळी अर्जदाराला पुढील तीन दिवसांत अपॉईन्टमेंट मिळते. सात दिवसांत अर्जावर कार्यवाही होते आणि 10 व्या दिवशी पासपोर्ट अर्जदाराच्या हातात मिळतो.

यापूर्वीची प्रक्रिया खूप वेळ खाऊ होती. आता मात्र, पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाइन पद्धत अवलंबण्यात आल्याने अर्जदाराच्या वेळेत खूप बचत होणार असल्याचे, गाझियाबादचे पासपोर्ट अधिकारी सीताराम यादव यांनी सांगितले आहे.
दरम्यान, यापूर्वी पासपोर्ट बनवण्यासाठी पोलिस चौकशी आवश्यक होती. मात्र, ही प्रक्रिया फारच गुंतागुंतीची होती. तसेच अनेक तक्रारीत समोर आल्या होत्या. त्यामुळे पासपोर्ट बनविण्यात खूप वेळ खर्च होत होता. अर्जदाराची डोकेदुखी कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
STEPS-1- ‘पासपोर्ट सेवा पोर्टल’वर स्वत: नोंदणी करावी
सगळ्यात आधी ‘पासपोर्ट सेवा पोर्टल’च्या वेबसाइट https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/welcomeLink ला भेट द्यावी.
होमपेजवरील register now या बटनावर क्लिक करावे. नवे युजर असल्याने अर्जदाराला स्वत: नोंदणी करावी लागेल. त्यात आपली वैयक्तीक माहिती भरावी. जन्मतारीख तसेच ई-मेल आयडी द्यावा लागेल.
अर्जदाराला ई-मेल आयडीवर ‘लॉगइन आयडी’ मिळेल. नंतर अर्जदाराने पुन्हा पासपोर्ट सेवा पोर्टलच्या होमपेजवर जाऊन पुढील माहिती द्यावी लागेल.
STEPS-2- लॉगइन करावे

ई-मेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करून आपले अकाउंट अॅक्टिव्हेट करावे. त्यानंतर युजर आयडी भरावे नंतर पासवर्ड टाकावा. लॉगइन झाल्यानंतर ‘अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट’ (Apply For Fresh Passport) अथवा ‘री इश्यू ऑफ पासपोर्ट’ (Re-issue of Passport) लिंकवर क्लिक करावे लागेल. क्लिक करताच दोन विंडोज तुमच्या समोर दिसतील. जर अर्जदाराला पासपोर्ट ऑनलाइन बनवायचा असेल तर दुसरी विंडोवर (पर्याय) क्लिक करावे.
STEPS-3-पर्याय निवडावे…
अर्जदार जर पहिल्यांदा पासपोर्टसाठी अर्ज करत असेल तर ‘अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट’ (Apply For Fresh Passport) वर क्लिक करावे.

‘अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट’वर क्लिक केल्यानंतर अर्जदारासमोर अनेक अर्ज (फॉर्म) दिसतील. त्यासाठी अर्जदाराकडे माहिती मागितली जाईल. सर्व अर्ज अचूक आणि व्यवस्थित भरावे. कारण, एकदा पासपोर्टची प्रक्रिया फेटाळल्यानंतर दुसर्‍यांदा अर्जदाराला अनेक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

STEPS-4- कौटुंबिक माहिती भरावी…

अर्जदाराने वैयक्तीक माहिती भरल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करावे. सेव्ह केलेले पेज युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर कधीही उघडता येईल. नंतर पुढील पेजवर अर्जदाराला त्याची कौटुंबिक माहिती भरावी लागेल. माहिती भरल्यानंतर पेज सेव्ह करावे. नंतर राहात्या घराचा पत्ता (एड्रेस) भरावा. नंतर सेव्ह करावे. नंतर एमरजेंसी कॉन्टेक्ट डिटेल्स भरावी.
STEP-5- शुल्क भरावे आणि पासपोर्ट मिळण्याचा कालावधी

‘व्ह्यु सेव्ह/सबमिटेड अॅप्लिकेशन्स’ (View Saved/Submitted Applications) स्क्रीनवर दिसेल. ‘पे अँण्ड शेड्यूल अपॉइंटमेंट’ (Pay and Schedule Appointment) लिंकवर क्लिक करावे. अप्वाइंटमेंट अर्थात आपला भेटण्याचा वेळ निश्चित करावा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो उघडेल. त्यावर पासपोर्ट बनविण्याचे शुल्क भरावे लागेल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग तसेच एसबीआय बॅंक चलनच्या माध्यमातून शुल्क भरता येते.
STEPS -6- अॅप्लिकेशन रिसीप्ट

संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर प्रिंट अॅप्लिकेशन रिसीप्ट लिंकवर क्लिक करावे. रिसीप्टमध्ये आपला अॅप्लिकेशन रेफेरेंस क्रमांक आणि अपॉईंटमेंट क्रमाक असेल.

STEPS-7- ओरिजनल डॉक्युमेंटसोबत घेवून जावे…

ज्या पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉईंटमेंटला जाताना आपले ओरिजनल डॉक्युमेंट सोबत न्यावे. अपॉईंटमेंट झाल्यानंतर एक आठवड्यात पासपोर्ट तुमच्या घराच्या पत्त्यावर येईल. पासपोर्टची सॉफ्टकॉपी ऑनलाइन देखील घेऊ शकतात.