पंकजांच्या वाट्याला घरामधला आणि पक्षातला संघर्ष : प्रकाश महाजन

0
14

औरंगाबाद दि.४ : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पक्षातील्या संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे. मात्र त्यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमवून सर्वांना उत्तर दिलं आहे. यातून भाजपने बोध घ्यावा, यात त्यांचाच फायदा आहे, असं पंकजांचे मामा प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत प्रकाश महाजन बोलत होते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने संघर्ष करुन नेतृत्त्व सिद्ध केलं तेच पंकजालाही करावं लागत आहे. मात्र नेता व्हायचं असेल तर हे केलंच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं