नांदेड जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार भागवत देवसरकर यांना जाहीर

0
12
नांदेड दि. 13 -शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषीनिष्ठ पुस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी पुरस्कारासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांची निवड करण्यात आली.
भागवत देवसरकर यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा, शेडनेट हाऊसच्या माध्यमातून शेती करून उत्पन्न वाढविले आहे. डच गुलाब, कांदा, ऊस पिकाची लागवड आधुनिक पद्धतीने करून उत्पन्नात वाढ केली आहे. शेतीमधून नवनवीन पद्धतीचा अवलंब करून शेडनेटमध्ये डच गुलाबाची लागवड केली आहे.
भागवत देवसरकर यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, अंकुशराव मोरे, डॉ. गणेश शिंदे, डॉ. सोपान क्षीरसागर, नानाराव कल्याणकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, कृषी परिषदेचे चक्रधर पाटील, संजय दळे पाटील, गुणवंत आठरे, गजानन चोपडे, विनीत पाटील,दिपक पवार,परमेश्वर काळे, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.