भीमा कोरेगावच्या हल्ल्याचा कट पूर्व नियोजित होता-संविधान दुगाने….!

0
15
नांदेड ( सय्यद रियाज ),दि.03ः- भीमा कोरेगाव शौर्य दिनाला काल 200 वर्ष पूर्ण झाले असून या ऐतिहासिक दिवसाला छेद देऊन देशात अशांतता पसरविणे हा या भ्याड हल्ल्या मागचा हेतु होता.ह्या हल्ल्याचे मुख्यसूत्रधार संभाजी भिडे,मिलिंद एकबोटे व घुगे हे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याचा आरोप इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी केला आहे.
   आपल्या शूर 500 महार सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या  12 लाखाहून अधिक भिमसैनिकांची या भ्याड हल्ल्यामुळे तारांबळ उडाली होती.या सर्व बाबींस हे मनुवादी भाजप सरकार व पोलीस प्रशासन कारणीभूत आहे.भीमा कोरेगाव या विजय स्तंभाचा द्विशताब्दी वर्ष असल्या कारणाने जगभरातून भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत याची पूर्वकल्पना असतांनाही शासनाने चोख बंदोबस्त का ठेवला नाही?हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतो आहे.
       लवकरात लवकर या हल्ल्याच्या संबधित मुख्यसूत्रधाराना अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.या बाबींची तात्काळ न्यायालयीन चौकशी करावी.आणि संबधित घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा तात्काळ  राजीनामा द्यावा आणि कर्तव्यावर असून सुद्धा आपली भूमिका बजावन्यास हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याना तात्काळ निलंबित करण्यात यावे.समाजकंटकाकडून हा जो  भ्याड जीव घेणा हल्ला झाला या हल्ल्याचा इंडियन पँथर् सेनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी जी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या बंदला जाहीर पाठींबा दर्शवतो.शासन यासंदर्भात ठोस पाऊल न उचलल्यास संपूर्ण देशभर आंदोलन पेटेल.आणि जर 1818 ची पुनरावृत्ती होऊन आंदोलनाच्या माध्यमातून जीवितहानि झाली तर यास पूर्णतः शासन प्रशासन जबाबदार असेल याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी अस मत इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी बेरार,टाईम्स शी  बोलतांना सांगितले.