अर्धापूर येथे तणावपूर्ण शांतता, आठवडी बाजारात दोन गटात हाणामारी

0
18

नांदेड,दि.13 :अर्धापूर येथील शुक्रवार आठवडी बाजारात दुकान लावण्याचे जागेच्या कारणावरून बागवान मुस्लिम व हिन्दू व्यापाऱ्यांत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वाद झाला. हे  भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शंकर कडेकर यांच्या  छातीत वजनी मापाचा मार लागल्याने त्यांना  अस्वस्थ वाटू लागल्याने नांदेड येथील आधार दवाखान्यात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. ही घटना शहरात  समजताच हिन्दु मुस्लिम गटात दगडफेक झाली. यामध्ये किशन तुकाराम गोरे हे डोक्यात दगड लागल्यामुळे जख्मी झाले. एकच धावपळ झाली यावेळी जनावरे बुजाडली यामुळे  अनेक जण जखमी झाले. महिला मुलांची धावपळ व शहरात आसवांचे पेव फुटले हा प्रकार सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.मयतांच्या नातेवाईकांनी मयताचा शव असलेली व्हॅन पोलीस ठाण्यात आणुन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाल्या शिवाय शवविच्छेदन करणार नाही अशी भूमिका घेतली .याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा  सुरू होती.
याघटनेत शहरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संपूर्ण दुकाने व बाजारपेठ बंद झाली दोन्ही गटातील लोक समोर समोर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या एक अॅटो उलटवला,भाजीपाला नासधूस केली. याघटनेत अर्धापूर पोलीसांनी तात्काळ अ‍ॅक्शन घेऊन शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी वृत्त कळताच पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मिना, आप्पा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी भेट दिली या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय डोंगरे,दिपक दंतुलवार सहा.पो.उपनिरिक्षक त्र्यंबक गायकवाड,गणेश गायके.डिंगाबंर जामोदकर, परमेश्वर कदम,विद्यासागर वैद्य, हेमंत देशपांडे, दत्ता वाणी, किशोर पाटील, प्रकाश कडदनवार, एस.एम.धुसिंगे,संजय पाध्ये, सुनिल सुनपे,संजय कळके,बालाजी लामतुरे, वावळे, यांच्यासह पोलीस, महसुल विभागाचे अधिकारी कर्मचारी परिस्थिती वर नियंत्रण ठेवून आहेत.

नागरिकांनी शांतता राखावी- पोलीस अधिकाऱ्यांचे आवाहन

शहरात सध्या शांतता आहे.नागरिकांनी आफवावर विश्वास ठेवू नये व शहरात   शांतता राखावी असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय  पोलीस अधिकारी अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विजय डोंगरे, उपविभागीय अधिकारी महसूल प्रदिप कुलकर्णी तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी केले आहे.

अर्धापुरात दंगल खा. चव्हाण सत्कारात मग्न
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण शहरात असताना दोन गटात हानामारी झाली यानंतर दगडफेक ,दंगल झाली.खा.अशोक चव्हाण शहरात असताना देखील भेट देण्यासाठी आले नाही मात्र ते सत्कार घेणे व सत्कार करण्यात मग्न होते यामुळे जनतेत उलटसुलट चर्चा होती.