24 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ माजी सभापती कलाम शेख यांचा भाजपला रामराम

माजी सभापती कलाम शेख यांचा भाजपला रामराम

0
31

तुमसर,दि.13 : पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती तसेच अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व २५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक कलाम शेख यांनी गुरुवारला भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून भाजपला हादरा दिला आहे.कलाम शेख अल्पसंख्यक असतानाही पक्षाबाबत असलेली निष्ठा ही त्यांच्या जमेची बाजु होती. त्यामुळे पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र पक्ष सत्तेत आल्यानंतर निष्ठावानाची कदर होत नव्हती.
दुसºया पक्षातून प्रवेश करणारे इथे निष्ठेची भाषा करु लागले होते. त्याचबरोबर भाजपात हुकूमशाही सुरु झाल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये खदखद निर्माण झाल्यानेच आपण राजीनामा देत असल्याचे शेख यांनी सांगितले. अन्य पक्षात प्रवेश न करता बहुजनांच्या चळवळीत सक्रिय राहणार असल्याचे कलाम शेख यांनी स्पष्ट केले आहे.

blank