महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंचे पुतळे येणाऱ्या पिढीला संदेश देत राहतील- मुख्यमंत्री अशोक गहलोत

0
25

नांदेड,दि.03ः- महानगरपालिकेच्या सौंदर्यामध्ये भर घालणारे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे येणाऱ्या पिढीला सामाजिक समता आणि शिक्षणाचा संदेश देत राहतील, असे विचार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केले.नांदेड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या फुले दांपत्याच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. विचारमंचावर खासदार अशोक चव्हाण, आ. संपतराव, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, माणिकराव ठाकरे, आ. डी.पी.सावंत, आ. अमर राजूरकर, आ. वसंत चव्हाण, आ. सतीश काळे, महापौर शीला भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर आदी उपस्थित होते.

गहलोत पुढे म्हणाले की, राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माझा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रमही सामाजिक समता आणि शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त होत आहे आणि माझ्या हातून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. राजस्थानप्रमाणेच आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन होईल आणि अशोकराव चव्हाण नेतृत्व करतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.

खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले की, फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण करुन आम्ही वचनपूर्ती केली आहे. शहरातील लोकांनी आम्हाला जी साथ दिली त्यामुळेच आम्ही शहराचा कायापालट करु शकलो. कार्यक्रमाला निमंत्रण देवूनही जे उपस्थित राहिले नाहीत त्यांच्याबाबत बोलतांना अशोकराव चव्हाण म्हणाले की, ज्यांना फुलेंचे विचार मान्य नाहीत तेच गैरहजर राहिले आहेत.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे खासदार राजीव सातव हेही अनुपस्थित होते याचा बहुधा अशोक चव्हाणांना विसर पडला असावा.आमदार डी.पी.सावंत यांनी सांगितले की, आता आमचे लक्ष्य महात्मा बसवेश्वर, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पुतळे उभारण्याचे आहे.नगरसेवक दुष्यंत सोनाळे, मोहिनी येवनकर यांच्या वतीने गहलोत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला स्थायी समितीचे सभापती फारुख अहमद, महेश कनकदंडे, सर्व नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित