श्री हजूरसाहिब साहित्य संमेलन१९ आणि २० जानेवारीला 

0
9

दोन दिवसीय संमेलनात राहणार पर राज्यातूनही साहित्यिक

नरेश तुप्तेवार
नांदेड, दि. 5 – येथील श्री हजूरसाहिब साहित्य संमेलन समूहातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त आणि श्री गुरु नानकदेवजी यांच्या ५५० व्या जन्मोत्सव वर्षाच्या प्रचाराच्या दृष्टीने येत्या दि. १९ जानेवारी २०१९ आणि दि. २० जानेवारी २०१९ रोजी दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. श्री गुरु ग्रंथसाहिब भवन येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनात सोलापूर, उस्मानाबाद, हैदराबाद, निजामाबाद, अमरावती, औरंगाबाद, लातूर, लखनौ येथून साहित्यिक, कवी, लेखक यांची उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती संमेलन आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमेतून दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, श्री गुरु गोबिंदसिंघजी यांचे वास्तव असल्याने नांदेड नगरीला श्री हजुरसाहिब असे संबोधिले जाते. हजूरसाहिब शहराचे वैशिष्टय वेगळे असून एक मिश्रित संस्कृती येथे प्रवाहात आहे. तसेच या नगरीला प्राचीन आणि आधुनिक इतिहास आहे. येथे जगप्रसिद्ध गुरुद्वारा असल्याने या धार्मिक स्थळाचे सर्वत्र नावलौकिक आहे. येथील संस्कृती, इतिहास आणि साहित्य प्रचारित करण्याच्या दृष्टीने हिंदी भाषेमध्ये मागील वर्षी श्री हजूरसाहिब साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात आली होती. यंदा साहित्य संमेलनाचा दुसरा वर्ष आहे. संतांच्या आशीर्वादाने आणि सर्वधर्मीय साहित्यिकांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे.
संमेलनात नामवंत अशे साहित्यिक, वक्ते आणि कवी हजेरी लावणार आहेत. तसेच निवडक आणि आमंत्रित हिंदी कवींचे संमेलन देखील होणार आहे. या संमेलनाचे मुख्य आयोजक रविंदर सिंघ मोदी, कार्याध्यक्ष डॉ. गिरीशसिंह पटेल, मार्गदर्शक प्रा. राजाराम वट्टमवार, श्री नारायण शिंदे, श्रीमती नरेंद्र कौर छाबडा (औरंगाबाद), डॉ. परविंदरकौर महाजन (कोल्हापुरे), जयप्रकाश नागला, डॉ. प्रकाश निहलानी, राजेंद्रसिंह माला मुख्याध्यापक, गुरुबचन सिंघ प्राचार्य, गोविंदप्रसाद उपाध्याय, प्रा. डॉ. सुनील जाधव, डॉ. अरुणा शुक्ला, श्रीमती वैशाली तेहरा मुख्याध्यापक, हरजिंदर कौर सोहेल, सुरज कुमार, अविनाश पाटील पत्रकार, गुरप्रीतसिंघ सोखी, महेलसिंघ लाँगरी, परशनसिंघ महंत, बिरेंद्रसिंघ बेदी, आशिष नागला आदीं संमेलनाच्या तयारीला लागले असून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व साहित्यिक आणि नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.