भजेपार चषक खेळाडू निर्मितीचा कारखाना – नाना पटोले

0
7

अंतरराज्यीय महिला, पुरुष कबड्डीचा महासंग्राम उद्घाटन सोहळा संपन्न

सालेकसा,दि.05ः- महाराष्ट्रातील पूर्व टोकावर वसलेल्या सालेकसा तालुक्यातील भजेपार या छोट्याशा गावात आंतरराज्य महिला, पुरुष कबड्डीचा महासंग्रामचे भव्यदिव्य कार्यक्रम प्रत्येक वर्षी केले जात असते. भजेपार चषकचे उत्कृष्ट आयोजन संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. भजेपार चषकमधून उत्कृष्ट कबड्डी खेळाडू निर्माण होऊन राज्यस्तरापर्यंत पोहचले असून जनू भजेपार चषक खेळाडू निर्मितीचा कारखाना ठरत आहे. कबड्डीसारख्या खेळास राजाश्रय मिळणे काळाची गरज असून शासनाने याकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. निद्रस्त असलेल्या सरकारचे शेतकरी राजाकडे दुर्लक्ष कायम होत चाललेल्या असून शासनाला जागे करण्याची काळाची गरज आहे असे वक्तव्य माजी खासदार नानाभाऊ पटोले यांनी केलेले आहे. ते सर्वोदय क्रीडा मंडळ, नव्युवक कबड्डी क्लब व ग्राम पंचायत भजेपार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराज्यीय महिला पुरुष कबड्डीचा महासंग्राम या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक स्थानावरून बोलत होते.
कबड्डी हा खेळ ग्रामीण भागात प्रामुख्याने खेळला जात असतो. लोकांचे घनिष्ठ नातं या खेळाशी आहे. युवकांनी खेळांमध्ये आपलं करियर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे असे वक्तव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमगाव, देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी पुराम यांनी केले. कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणुन माजी आमदार रामरतनबापू राऊत, दीपप्रज्वलक लताताई दोनोडे सभापती महिला व बालकल्याण जि.प. गोंदिया तर प्रमुख अतिथी म्हणून परसरामजी फुंडे, सकारामजी राऊत सरपंच ग्राम पंचायत भजेपार, कैलासजी बहेकार व विशेष आकर्षण सिनेस्टार एड. गणेश देशमुख नाळ फेम मुंबई, सत्कारमूर्ती अशोक काकडे संस्थापक अध्यक्ष दिव्या फाऊंडेशन, रवी नोणारे, प्रभाकर दोनोडे, तुकाराम बोहरे,रमेश चुटे, राजेंद्र बडोले, राजू काळे, संजय देशमुख, संतोष अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरावर खो-खो, कबड्डी स्पर्धांसाठी खेळण्यासाठी गेलेल्या खेळाडूंचे व भजेपार एकता दौड स्पर्धेत महिला गटात प्रथम भाग्यश्री बहेकार, द्वितीय सुस्मिता बहेकार, तृतीय निलेश ऊईके, पुरुष गटात प्रथम दुलीचंद कोरे, द्वितीय दुर्गेश फुंडे, तृतीय शिवम मरस्‍कोले यांना सन्मानित करण्यात आले. आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या क्रीडा साहित्यांचे गावातील युवकांना वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वोदय क्रीडा मंडळ, युवक कबड्डी क्लब भजेपारचे अध्यक्ष चंद्रकुमार बहेकार यांनी मांडले तर कार्यक्रमाचे संचालन रमसुला चुटे यांनी केले असून उपस्थितांचे आभार लोकेश चुटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वोदय क्रीडा मंडळ, नव्युवक कबड्डी क्लब व ग्राम पंचायत भजेपार च्या पदाधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
सेल्फी घेण्यास सरसावली तरुणाई
या वर्षि भजेपार चषकमध्ये विशेष आकर्षण ठरलेल्या सिनेस्टार एड. गणेश देशमुख (नाळ फेम मुंबई) यांच्याशी सेल्फी व छायाचित्र काढण्यासाठी कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून आलेली तरुणाई व रोड नागरिक सरसावली.