भाजप-शिवसेना-रिपाई(आ) युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज

0
17
भंडारा/गोंदिया,दि. 25 मार्च :  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाई(आ) युतीचे अधिकृत उमेदवार भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी 25 मार्च रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी हजारो भाजप, शिवसेना व रिपाई  कार्यकर्ते व समर्थकांसह भंडारा येथील साखरकर सभागृह ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.
निवडणूक अर्ज भरताना सोबत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बंडोले, म्हाडाचे अध्यक्ष अध्यक्ष तारिक कुरैशी, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेशभाऊ कुथे,  नागपुर विधानपरिषद क्षेत्राचे आमदार व लोकसभा प्रभारी गिरीश व्यास, विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, आमदार डॉ परिणय फुके, गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, भंडारा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, आमदार चरण वाघमारे, आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, आमदार विजय रहांगडाले, आमदार राजेश काशिवार, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी खासदार शिशुपाल पटले, शिवसेना संपर्क प्रमुख नीलेश धुमाळ, शिवसेना भंडारा जिल्हाप्रमुख नरेंद्र भोंडेकर, गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष आसित बागडे आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील मेंढे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात  भंडारा-गोंदिया क्षेत्राला पुढे नेण्याकरिता जनतेचा आशीर्वाद निश्चितच मिळणार असून भाजपचा झेंडा लोकसभेत फडकणार असल्याचा विश्वास उमेदवार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला आहे.