कर्ज नामंजूर प्रकरणाच्या चौकशीची जिल्हाधिकारीकडे मागणी

0
17

संख :(राजेभक्षर जमादार),दि.02ः- उद्योगधंद्यासाठी केलेल्या कर्ज मागणीसाठी लागणारे कागदपत्र देऊन सुध्दा कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी संख येथील महानंदा बसगोंडा बिरादार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करीत चौकशीची मागणी केली आहे. पीएमईजीपी ( प्रायमिनिस्टर एप्लायमेंट जनरेशन पोग्रॅम) अंर्तगत महाराष्ट्र बँकेमध्ये उद्योगधंद्यासाठी कर्जाची मागणी महानंदा बसगोंडा यांनी केली होती. त्यानुसार बँकेने कर्जाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली.कर्ज प्रस्तावाला लागणारे कागदपत्र पूर्ततेसाठी ६० हजार रुपये खर्च झाले असताना कर्ज नामंजूर केल्याने चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनव्दारे केली आहे.

पूर्व भागातील संख येथील महानंदा बसगोंडा बिरादार यांचा स्वतःचा रेडीमेड गारमेंट उद्योग आहे. या उद्योगासाठी पीएमईजीपी योजने अंर्तगत बँक ऑफ महाराष्ट्र येथे कर्जाची मागणी केली होती. कर्जासाठी लागणारे आयटी रिटर्न, प्रोजेक्ट रिपोर्ट, जामिनदाराचे पगारपत्रक, मंजुरी पत्र, ना हरकत दाखला या कागदपत्राची पूर्तता करून दिली होती. बँकेने कर्जाला मंजुरी दिली.पाच लाख रुपये कर्ज मंजूर केले आहे.परंतु शाखा व्यवस्थापक यांनी विविध कारणे सांगून कर्ज नामंजूर करण्यात आले आहे.

कर्जासाठी मी बँकेकडे वर्षभरापासून हेलपाटे मारत आहे. मला कर्ज देण्यासाठी बँकेने आशा वर ठेवलेले आहे. बँकेला कर्ज द्यायचे नसतानाही हेलपाटे मारायला लावले आहेत. कर्जासाठी लागणा-या कागदोपत्राची पूर्तता करण्यासाठी ६० हजार रुपये खर्च झालेला आहे. तसेच कागदोपत्राची पूर्तता करण्यासाठी शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. धंदाकडे दुर्लक्ष झालेले आहे. अगोदर कर्जाला मंजुरी देऊन परत नामंजूर करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.