आर.के.पाटील महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा शुभारंभ

0
15

संख(राजेभक्षर जमादार),दि.25ः- संख येथील श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेद्वारे संचालित आर.के.पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमात एम.ए.चे अभ्यास वर्गाचे शुभारंभ करण्यात आले असून विद्यालयातील विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात पदवी प्रमाणपत्राचे वितरण व सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन बालगाव गुरुदेवाश्रमाचे प्रमुख
प.पू.डॉ.अमृतानंद महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सभापती ब्रमहानंद पडोळकर,य.च.म.मु.विद्यापीठ नाशिकचे विभागीय संचालक दादासाहेब मोरेे ,शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवि पाटील,अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ,माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग,संस्थेेेचे अध्यक्ष तथा माजी सभापती आर.के.पाटील,संस्थेचे संचालक जी.आर. पाटील,श्रीकांत पाटील,मुख्याध्यापिका ज्योती आर.पाटील,प्रा.आर.बी.पाटील,सुरेखा पाटील,कविता पाटील, किरण पाटील ,अप्पासाहेब पाटील ,माजी समाज कल्याण सभापती आकाराम मासाळ , प्रा.ईटेकर ,प्रा.वठारे,प्रा.बी.एस.पाटील, तम्माराव बागेळी,माजी सैनिक अब्बास सैय्यद ,व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सभापती ब्राम्हणानंद पडोळकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देतांना  नेहमी दुष्काळाचे सावट असलेल्या भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी आणि त्यांनी आपले भविष्य उज्वल करुन एमपीएससी. व युपीएससी परीक्षा देऊन अधिकारी व्हावे तसेच आई वडीलांचे व संस्थेचे नावलौकीक करावे असे विचार व्यक्त केले. अप्पर तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी तयार करायची असेल तर मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला देत गरजेनुसारच मोबाईलचा वापर करा असेही म्हणाले.प.पू.डॉ .अमृतानंद महास्वामीजी यांनी तालुक्याच्या ठिकाणी न जाता आता आपल्या गावातच उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.यावेळी सत्कार मुर्ती म्हणून उदगेरी(निवृत्त केंद्र प्रमुख),अरविंद करडी,(शिक्षकरत्न व बसव प्रशस्ती पुरस्कृत),दिलिप कसबे,(निवृत्त मुख्याध्यापक),सौ.महादेवी पुजारी,(निवृत्त शिक्षिका),परप्पा चौधरी,(निवृत्त शिक्षक)गुरुबसव वाघोली,(शिक्षक रत्न पुरस्कृत),प्रशांत वाघोली,(शिक्षक रत्न पुरस्कृत),कु.श्रेया हिप्परगी,(अंतराष्ट्रीय बुद्धीबळ खेळाडू, संख)यांचा सत्कार डॉ .अमृतानंद महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रामास आधी मान्यवर उपस्थित होते.