रिटर्नमध्ये द्यावी लागेल सर्व बँक खात्यांची माहिती

0
8

नवी दिल्ली – या वेळी जेव्हा तुम्ही प्राप्तिकर रिटर्न जमा कराल त्या वेळी तुम्हाला सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागेल. परदेश दौरा केल्यास त्याचेही विवरण द्यावे लागेल.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी नवे आयटीआर अर्ज जारी केले आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. सामान्य करदात्यांसाठी आवश्यक आयटीआर-१ आणि आयटीआर-२ मध्येही या दुरुस्त्या केल्या आहेत. त्यात आधार क्रमांकासाठीही एक कॉलम देण्यात आला आहे. ही सर्व माहिती भरावी लागेल.

बँक खात्यांबाबत
– वर्षात जेवढी बँक खाती असतील त्या सर्वांची माहिती द्यावी लागेल.
– बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक, आयएफसी कोड द्यावा लागेल.
– ३१ मार्चला त्या खात्यांत किती रक्कम होती हे सांगावे लागेल.
– जॉइंट अकाउंट असेल तर त्याचीही माहिती द्यावी लागेल.

परदेश दौऱ्याबाबत
– पासपोर्ट क्रमांक, कुठून जारी झाला ते सांगावे लागेल.
– कोणत्या देशांचा किती वेळा दौरा
– या दौऱ्यांत करदात्याने किती रक्कम खर्च केली त्याची माहिती द्यावी लागेल.