रिझर्व्ह बॅंकेकडे 557 टन सोने – जेटली

0
15

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. ५ – भारतातील 557.75 टन सोने हे रिझर्व्ह बॅंकेकडे असून 20 हजार टन जनतेकडे असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (मंगळवार) राज्यसभेत दिली आहे.

‘द रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे 557.75 टन सोने आहे. जनतेकडे असलेल्या सोन्याची सरकारला माहिती नाही.‘ अशी माहिती जेटली यांनी एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. एका अहवालानुसार देशातील जनतेकडे जवळपास 20 हजार टन सोने असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. सरकारने 1999 साली सोने जमा करण्याची मोहिम राबविली होती. त्याचा उद्देश देशातील सोने एकाच ठिकाणी गोळा करण्याचा होता, असेही जेटली पुढे म्हणाले. भारत हा जगातील सर्वाधिक सोने आयात करणारा देश आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळपास 800-900 टन सोने आयात करण्यात येते.