हरभऱ्यावर तांबेऱ्याची लागण; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

 नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. भागवत देवसरकर यांची प्रशासनाकडे मागणी

0
196
नांदेड,दि 15 मार्च :रब्बी हंगामातील हरभरा पिकावर तांबेरा रोगाची लागण झाल्यामुळे हरभऱ्याचे पीक उभे असूनही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, एकही घाट लागला नाही, फुल येण्याच्या काळामध्ये तांब्याऱ्याची लागण झाल्यामुळे हरभऱ्याचे पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे,यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक सरक्षण समितीचे सदस्य भागवत देवसरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
हदगाव तालुक्यात हरभरा,गहू या पिकावर सध्या तांबेरा रोगाने प्रचंड थैमान घातले असून तांबेराची लागण झाल्यामुळे पीक पूर्णतःनष्ट होण्याच्या मार्गावर आहे,अगोदरच अवकाळी पावसाने खरीप हंगाम वाया गेला आहे, या हंगामात जमिनीत ओल असल्यामुळे शेतकऱ्याने हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती, रब्बी हंगामात हरबरा पीक चांगले येईल या आशेवर होते परंतु तांब्याऱ्याने हरबरा पिक होत्याचे नव्हते, या नुकसानग्रस्त हरभरा पिकाचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी भागवत देवसरकर,हदगाव तालुकाध्यक्ष विलासराव माने, भगवान कदम,शेख रहीम,रमेश पवार, शरद पवार पाथरडकर,विठ्ठल पवार,योगेश पवार,लक्ष्मण पवार, अविनाश कदम वायपणकर,नागेश कदम,अविनाश ताकतोडे,संतोष पवार,गजानन कंठाले, सतिष शिंदे,विनोद अमृते,पांडुरंग शिंदे,यांच्यासह पाथरड, आष्टी,तामसा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.