राहुल-प्रियंका आज पुन्हा हाथरससाठी होणार रवाना,तर मीडियाला तिसऱ्या दिवशी पीडितेच्या गावात जाण्यास मिळाली एंट्री

0
176

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)ः- हाथरस गँगरेप प्रकरणात मीडियाला पीडितेच्या गावात जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे. यापूर्वी SIT तपासाचे कारण देत पोलिसांनी 2 दिवस मीडियाला अडवले होते. तिकडे काँग्रेस नेता राहुल आणि प्रियंका गांधी पुन्हा एकदा हाथरससाठी रवाना होणार आहे. यापूर्वी गुरुवारी राहुल आणि प्रियंका यांना हाथरसमध्ये जाताना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर अडवण्यात आले होते. दोघांना यूपी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी म्हटले होते की, त्यांनी कलम 188 चे उल्लंघन केले आहे.

पोलिसांनी राहुलची कॉलरही पकडली होती. धक्काबुक्कीत ते खाली पडले आणि त्यांच्या हाताला इजा झाली. राहुल आणि प्रियांका यांना चार तास ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. दोघांना गॅंगरेप पीडितेच्या कुटूंबाला भेट देण्यासाठी हाथरसच्या बुलीगड गावी जायचे होते.

राहुल गांधींचे ट्विट – पीडित कुटुंबासोबत केला जात असलेला व्यवहार मंजूर नाही
‘ती गोड मुलगी आणि तिच्या कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि त्यांच्या पोलिसांद्वारे केला जात असलेल्या व्यवहार मला स्वीकार नाही. कोणत्याही हिंन्दुस्तानीने स्वीकार करु नये.’ असे ट्विट करत राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

प्रियंका गांधी म्हणाल्या…
‘यूपी सरकार नैतिकरित्या भ्रष्ट आहे. पीडितेला उपचार मिळाले नाहीत. वेळेवर तक्रार नोंदवण्यात आली नाही. मृतदेह बळजबरीने जाळण्यात आला. कुटुंब कैदमध्ये आहे. त्यांना दाबले जात आहे. आता त्यांना धमकी दिली जातेय की, त्यांची नार्को टेस्ट केली जाईल. हा व्यवहार देशाला स्वीकार नाही. पीडितेच्या कुटुंबाला धमकावने बंद करा.’ असे म्हणत प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश सरकारव टीका केली आहे.