‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ जिल्हास्तरीय मोहिमेचा सीईओ व एसपींच्या हस्ते शुभारंभ

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन झाली अभियानाची सुरवात ; अती.कलेक्टर, एसडीओ,नप सीईओ,एसडीपीओनी 10 कुटुंबाला भेटी देऊन कोविड-१९ संदर्भात केले मार्गदर्शन १० हजार स्वयंसेवक-प्रचारक पोहचणार १ लाख कुटुंबापर्यंत

0
327

गोंदिया,दि.03- शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी प्रदीपकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात आज (दि.3)गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आले.मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे,पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,अपर जिल्हाधिकारी राजेश खवले परिविक्षाधिन जिल्हाधिकारी सावनकुमार,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार राजेश भांडारकर,अप्पर तहसिलदार अनिल खडतकर,उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, आणि गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण,शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक बबन आव्हाड यांची प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी नगरपरिषदेने प्रकाशित केलेल्या पत्रकांसोबतच टोपी व मास्कचे वितरण करण्यात आले.

मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी माहिती देतांना अति.जिल्हाधिकारी,एसडीओ व नप सीईओ

त्यांनतर अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले,एसडीओ वंदना सवरंगपते,सीईओ करणकुमार चव्हाण यांनी शेजारीत अग्रवाल कुटुंबियांना कोविड -19 बद्दल माहिती देत सुरक्षेबद्दलच्या उपाययोजनांची माहिती दिली.सोबतच इतर 10 जणांपर्यंत ही माहिती पोचविण्याचा सल्ला दिला.त्यानंतर गोंदियाचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या घरी पोचून त्यांनाही एसडीओ वंदना सवरंगपते,उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे, सीईओ करणकुमार चव्हाण यांनी माहिती देत नगराध्यक्षांसोबत 10 घरांना भेटी देत जनजागृतीपर माहिती पोचवली.

जनजागृती मोहिमेत नगराध्यक्ष अशोक इंगळे सहभागी

मोहिमेचा शुभारंभ करतांना जिल्हा परिषद गोंदियाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे यांनी जिल्ह्यात एकाच दिवशी किमान 10 लाख नागरिकांपर्यंत कोविड-१९ संदर्भात माहिती व जनजागृती व्हावी या उद्देशाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.सोबतच यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी,शिक्षक, अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक,सरपंच,आशासेविकेसह स्वयंसेवी संस्था आणि प्रसारमाध्यमांचे सहकारी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे,नगरपरिषदेचे कर्मचारी श्री मिश्रा,महसुल मडंळ अधिकारी अतुल वर्मा यांच्यासह महसुल व नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.