ज्येष्ठ संगीतकार रविंद्र जैन कालवश

0
21

मुंबई, दि. ९ – सुमधूर संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक रविंद्र जैन यांचे शुक्रवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. जैन यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

रविंद्र जैन हे एका कार्यक्रमानिमित्त गेल्या शनिवारी नागपूरमध्ये आले होते. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मूत्रपिंडातील इन्फेक्शन पसरून महत्त्वाचे अवयव निकामी झाले होते. अखेरीस त्यांना उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी उपचारादरम्यान जैन यांनी अखेरचा श्वास घेतला.

२८ फेब्रुवारी १९४४ मध्ये अलीगढमध्ये जन्मलेले रविंद्र जैन यांना लहानपणापासून संगीताची आवड होती.