पुन्हा गिरीराज सिंहाची जीभ घसरली

0
12

वृत्तसंस्था
नवादा दि. १० – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत रहाणारे बिहारमधील भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री गिरीराज सिंह यांनी गोमांस आणि बक-यांच्या मांसामधला फरक समजावून सांगताना आई आणि बहिणीच्या नात्याचे उदहारण देऊन नवा वाद निर्माण केला आहे.
माणसाचे त्याच्या पत्नीबरोबरचे आणि बहिणीबरोबरचे नाते वेगळे असते त्यात फरक असतो. तोच फरक बकरा आणि गायीच्या मांसमध्ये आहे. जे बक-याचे मटण खातात त्यांना कुत्र्याचे मटण दिले तर ते खातील ? असा सवाल त्यांनी केला.
गायीच्या आणि बक-याच्या मटणामध्ये फरक नाही या लालूंच्या विधानाला आपले हे उत्तर असल्याचा दावा गिरीराज यांनी केला.