क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाख करण्याबाबत महिनाभरात निर्णय- राजकुमार बडोले

0
6
 
नागपूर,दि.15 –राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा साडेचार लाखांवरुन सहा लाख करण्याबाबत शासन सकारात्मक असून या संदर्भात महिनाभरात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत दिली.विशेष म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या अधिवेशनातही बडोले यांनी असे उत्तर दिले होते.वर्ष लोटले परंतु अद्यापही हा निर्णय न झाल्याने सरकार ओबीसी विरोधी असल्याचे स्पष्ट होत आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना श्री. बडोले बोलत होते. ते म्हणाले की, राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत कपात करण्याचा राज्य शासनाचा कुठलाही हेतू नाही. गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या चार जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय आरक्षणासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल. महाड येथील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.