मा. गो. उवाच : महाराष्ट्राची चार राज्ये करा

0
5

नागपूर- महाराष्ट्राची एक-दोन नाही; तर चार राज्ये करा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केली आहे.  त्यावरून नवे वादळ उठण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र विदर्भ राज्याचे अनेकदा समर्थन करणारे श्रीहरी अणे विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र राज्य व्हावे, असे विधान करून गोत्यात आले. यावरून सरकारची कोंडी झाल्याने अणे यांना राजीनामा द्यावा लागला.

हा वाद अद्याप निवळलेला नसतानाच वैद्य यांनी या निमित्ताने आगीत तेल ओतत आरएसएसचा अजेंडा पुढे केला.

महाराष्ट्राची दोन नव्हेत; तर चार राज्ये करायला हवीत. संघाच्या परिभाषेत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा-खानदेशचा समावेश असलेला देवगिरी अशी चार राज्य आहेत.

आंदोलनातून या राज्यांची निर्मिती न होता सरकारने त्यासाठी नवीन राज्य पुनर्रचना आयोग नेमावा आणि त्या आयोगाने ही राज्ये वेगळी करावीत, असे मत मा. गो. वैद्य यांनी मांडले.